मोठी अपडेट! कंत्राटी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ व अनुभव बोनस मिळणार? महत्त्वाचे परिपत्रक..

Contract Employee : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कार्यरत कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांचेकडुन राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये विविध स्तरावर कार्यरत कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांना वार्षिक मानधनवाढ व बोनस मंजुर करुन अदा करण्याबाबतची विनंती करण्यात आलेली होती. या अनुषंगाने आता सहसंचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांच्याकडून एक महत्वाचे परिपत्रक काढण्यात आले आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ व अनुभव बोनस बाबत महत्त्वाचे परिपत्रक

Contract Employee

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सन 2022 23 या आर्थिक वर्षातील मंजुर वार्षिक मानधनवाढ व अनुभव बोनस कंत्राटी कर्मचा-याना अदा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सुचना सर्व संबंधीस्तरावर कळविण्यात आले आहे. 

तसेच सन 2023 24 या आर्थिक वर्षातील मंजुर वार्षिक मानधनवाढ व अनुभव बोनस सर्व कार्यरत कर्मचाऱ्यांना अदा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सुचना बाबतची कार्यवाही सुरु असुन, त्यास मंजुरी प्राप्त झाल्यावर सर्व संबंधीतस्तरावर परिपत्रकाव्दारे कळविण्यात येणार आहे.

गुड न्यूज! राज्यातील 34 कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत नियमित

$ads={1}

कंत्राटी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार नवीन वेतनश्रेणीचा लाभ!

त्याचप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये गेल्या अनेक वर्षापासुन 15 ते 16 वर्षापासून कार्यरत कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांच्या अनुभव बोनस मंजुर करुन अदा करण्याबाबतची विनंती संदर्भिय पत्राव्दारे करण्यात आलेली आहे. सदरची बाब विचाराधीन असून, याबाबत निर्णय झाल्यानंतर अवगत करण्याची दक्षता घेत आहोत असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

NHM Contract Employee

एकीकडे या कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेत कायमस्वरूपी नियमित पदांवरकरावे या प्रमुख मागणीसाठी NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांना ओडिशा, मणिपूर, राजस्थान, पंजाब, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेश सरकारने कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा लागू केल्या आहेत, याप्रमाणे आम्हाला समान काम समान वेतन नुसार शासकीय सेवेत कायम करावे, या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. सविस्तर येथे वाचा..

नुकताच सरकारने राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम व इतर राष्ट्रीय आरोग्य विषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक हया दोन्ही घटकांच्या भूमिका महत्वाच्या असल्यामुळे सदर कामांकरीता त्यांना प्रत्येकी 5,000 व 6,200 रुपये इतका वाढीव मोबदला देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

$ads={2}

कंत्राटी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार नवीन वेतनश्रेणीचा लाभ!
राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश!
दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! निवृत्तीवेतनाचे लाभ मंजूर

Post a Comment (0)
Previous Post Next Post