7th Pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात 4 टक्क्यांची वाढ! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय..

DA Hike Latest News : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महाराष्ट्र राज्यातील अधिकाऱ्यांच्या महागाई भत्यात तब्बल 4% टक्के वाढ करण्यात आली आहे, दिनांक 27 जून 2023 रोजी काढलेल्या आदेशान्वये आता 1 जुलै 2023 पासून सदर महागाई  भत्ता लागू करण्यात आला आहे.

$ads={1}

सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात 4 टक्क्यांची वाढ!

7th Pay commission

केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक 1 जुलै 2023 पासून लागू करण्यात आलेला 4% वाढीव महागाई भत्ता (Dearness Allowance) व ज्ञापनात नमूद इतर तरतूदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू करण्यात आला आहे. त्यानुसार आता 1 जुलै 2023 पासून या अधिकाऱ्यांना 46 % दराने महागाई भत्ता वाढ करण्यात आली आहे. तसा शासन आदेश दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

गुड न्यूज! राज्यातील या कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान मंजूर; शासन आदेश जारी..

तसेच महाराष्ट्र राज्यातील पिंपरी चिंचवड मनपा कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिनांक 1 जुलै 2023 पासून महागाई भत्ता वाढ मंजुर करण्यात आला असून, कर्मचाऱ्यांना वाढीव DA नुसार 46% प्रमाणे ऑक्टोबर 2023 महिन्याच्या पगारासोबत थकीत वेतन महागाई भत्ता (Dearness Allowance) वाढ मिळणार आहे, याबाबतचे आदेश मनपा कार्यालयाने 26 ऑक्टोबर रोजी जारी केले आहे. अधिक वाचा..

अंगणवाडी सेविकांसाठी केंद्र आणि राज्य सरकारचा मोठा निर्णय!
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश! सेवेत नियमित सामावून घेण्यासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय

आता राज्य सरकारी इतर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात देखील लवकरच वाढ करण्यात येणार असून, कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिनांक 1 जुलै 2023 पासून लागू होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

$ads={2}

Post a Comment (0)
Previous Post Next Post