Employees Increment : अखेर! शासकीय कर्मचाऱ्यांना 1 जुलैची काल्पनिक वेतनवाढ लागू, राज्य सरकारचा मोठा निर्णय!

Employees Increment : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनवाढ देण्यासंदर्भात शासनाने मोठा निर्णय घेतला आहे, असे शासकीय कर्मचारी जे दि. ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत अशा कर्मचाऱ्यांना दिनांक १ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत १७ नोव्हेंबर २०२३ रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

अखेर! शासकीय कर्मचाऱ्यांना 1 जुलैची काल्पनिक वेतनवाढ लागू, राज्य सरकारचा मोठा निर्णय!

Employees Increment

दिनांक ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या, होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लगतच्या १ जुलै ची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना यापूर्वीच वित्त विभागाच्या दिनांक 28 जून 2023 रोजीचा शासन निर्णयानुसार देण्यात आलेल्या आहेत.

सदर सूचना उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखालील अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्यासंदर्भात आता खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

हे ही वाचा कंत्राटी कर्मचारी - सरकारी कर्मचारी अपडेट्स

वित्त विभागाच्या दिनांक २८ जून, २०२३ च्या संदर्भीय परिपत्रकान्वये देण्यात आलेल्या सूचना अकृषि विद्यापीठे, अनुदानित महाविद्यालये, अनुदानित अभिमत विद्यापीठे, अनुदानित समूह विद्यापीठे व त्यांची घटक महाविद्यालये, अनुदानित तंत्र शिक्षण महाविद्यालये संस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठ-लोणेरे, सी.ओ.ई.पी. तंत्रज्ञान विद्यापीठ, अनुदानित कला संस्था, आय.सी.टी. विद्यापीठ, एल.आय.टी. अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ यामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येत आहेत. याबाबतचा शासन आदेश अखेर दिनांक १७ नोव्हेंबर २०२३ रोजी काढण्यात आला आहे. (शासन निर्णय)

$ads={2}

मोठी बातमी! राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ! महत्वाचे शासन शुध्दीपत्रक जारी, सविस्तर वाचा..

Post a Comment (0)
Previous Post Next Post