राज्यातील या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याचा निर्णय! सुधारित शासन निर्णय जारी

Employees New GR : राज्यातील उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या वाढीव पदांना मंजूरी देण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी शासनाकडे मंजूरीसाठी सादर करण्यात आला होता. त्यानुसार शासनास प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने पात्र शिक्षकांचे समायोजन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

राज्यातील या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याचा निर्णय! सुधारित शासन निर्णय जारी

employees new gr

राज्यातील उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील सन २००३-०४ ते सन २०१८-१९ मधील एकूण १२९३ शिक्षकांच्या वाढीव पदांना मंजूरी देण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी शासनाकडे मंजूरीसाठी सादर करण्यात आला होता. 

सदर १२९३ पदांपैकी यापूर्वीच्या वित्त विभागाच्या शासन निर्णयान्वये व्यपगत करण्यात आलेल्या ४२८ पदांपैकी एकूण २११ पदे पुनर्जिवित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

त्यानंतर उर्वरित वाढीव पदांना मान्यता देण्याच्या विषयाच्या अनुषंगाने राज्यातील वाढीव पदांवर विहीत कार्यपध्दतीने नियुक्त आणि कार्यभार उपलब्ध असलेल्या शिक्षकांचे त्याच किंवा अन्य संस्थेमध्ये समायोजन करणेसंदर्भात संचालक कार्यालयाकडून पडताळणी केलेल्या एकूण २१२ शिक्षकांचे समायोजन करण्यासंदर्भात माहिती प्राप्त झाली.

शासनास प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने राज्यातील उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयातील सन २००३-०४ ते सन २०१८-१९ या कालावधीतील वाढीव पदांवरील कार्यरत असलेल्या एकूण २८३ (२११+७२) पात्र शिक्षकांचे समायोजन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

विधानसभा प्रश्नोत्तरे

राज्य शासनास प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने राज्यातील उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयातील सन २००३-०४ ते सन २०१८-१९ या कालावधीतील वाढीव पदांवरील कार्यरत असलेल्या एकूण २८३ (२११+७२) पात्र शिक्षकांचे समायोजन करण्यास दिनांक ९ नोव्हेंबर रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

$ads={2}

मात्र ९ नोव्हेंबर रोजीच्या शासन निर्णायासोबतचे परिशिष्ट 'अ' व परिशिष्ट 'ब' मधील काही शिक्षकांचे नियुक्ती दिनांक, अध्यापनाचा विषय, प्रवर्ग व पद (अर्धवेळ/पूर्णवेळ) यामध्ये काही तांत्रिक चुका आढळून आल्याने, केवळ अशा शिक्षकांचे नियुक्ती दिनांक, अध्यापनाचा विषय, प्रवर्ग व पद (अर्धवेळ/पूर्णवेळ) सुधारित करण्यात येत असून यादी  सुधारित करण्यात आली आहे. याबाबतचा सुधारित शासन शुद्धीपत्रक दिनांक 4 डिसेंबर रोजी जारी करण्यात आले आहे.

गुड न्यूज! राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करण्यास मंजुरी
कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करण्याचा मोठा निर्णय! नवीन शासन निर्णय जारी

Post a Comment (0)
Previous Post Next Post