आनंदाची बातमी! राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश! सेवेत नियमित सामावून घेण्यासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय!

Contractual Employee : बेस्ट उपक्रमातील कंत्राटी नैमित्तिक कर्मचाऱ्यांना तातडीने बेस्ट सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यासंदर्भात नुकतीच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्यासह बेस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंघल यांच्यासोबत बैठक संपन्न झाली.

राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश!

Contractual Employee News

बेस्ट उपक्रमातील नैमित्तिक कामगारांनी मागील आठवड्यामध्ये बेस्ट उपक्रमांमध्ये सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी आझाद मैदान येथे उपोषण केले होते. त्यावेळी बेस्ट कामगार संघटनेनी अंबादास दानवे यांनी भेट घेतली होती, त्यानंतर यावर लवकरात लवकर बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दानवे यांनी दिले होते.

त्यानुसार नुकतीच महापालिका मुख्यालयात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्यासह बेस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंघल यांच्यासोबत बैठक घेतली.

NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, सेवेत कायम करण्याची मागणी

यावेळी माजी महापौर किशोरीताई पेडणेकर,  सुहास सामंत - अध्यक्ष बेस्ट कामगार सेना, अनिल पाटणकर - माजी अध्यक्ष बेस्ट,रंजन चौधरी - सरचिटणीस बेस्ट कामगार सेना उपाध्यक्ष उमेश सारंग  मनोहर जुन्नर, गणेश शिंदे आदी उपस्थित होते.

बेस्ट उपक्रमातील 725 पैकी 123 नैमित्तिक कामगारांना बेस्ट उपक्रम सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी घेतला आहे. याबाबतचे आदेश लवकरच काढण्यात येणार असून,  उर्वरित कामगारांना देखील टप्प्याटप्प्याने सेवेत कायम करण्यात येणार असल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.

राज्यातील कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत नियमित थेट पदावर समायोजन होणार
मोठी अपडेट! राज्यातील शिक्षकांच्या बदल्यांचा मार्ग मोकळा!

बेस्ट उपक्रमातील सेवानिवृत्त कामगारांच्या वारसांना विद्युत विभागात अनुकंपा तत्वावर सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याऐवजी, त्यांना नैमित्तिक कामगार म्हणून रोजंदारीवर घेण्यात आले होते. यामुळे कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी 16 वर्षांपासून त्यांचा संघर्ष सुरु होता.

Post a Comment (0)
Previous Post Next Post