महत्वाची अपडेट! राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत नियमित थेट पदावर समायोजन होणार

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (National Rural Health Mission) ही केंद्र सरकारची महत्वपर्ण योजना असून, या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात राज्य स्तरापासून ते गावपातळी पर्यंत विविध पदांवर कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करत आहे, या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याबाबत वेळोवेळी शासन स्तरावर बैठका घेण्यात आल्या असून, आता कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत नियमित थेट पदावर समायोजन करण्याबाबत महत्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत नियमित थेट पदावर समायोजन होणार

National Health Mission

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कर्मचारी यांना शासन सेवेत नियमित पदावर थेट समायोजन करण्याबाबत मा. मंत्री, सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे अध्यक्षतेखाली दि.18 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या बैठकीत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रीय आरोग्य आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या Senior Nursing Midwifery, Engineer-Biomedical, Nutritionist, Staff Nurse, TB Supervisor, Librarian, ANM, Lab Technician, Pharmacists, Technician, Driver या तांत्रिक व अतांत्रिक पदावरील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित (प्रवेश) करण्यासाठी तांत्रिक व अतांत्रिक पदांच्या समकक्ष असलेल्या पदांच्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश! सेवेत नियमित सामावून घेण्यासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय

तसेच सेवा प्रवेश नियम अंतिम झाल्यानंतर या तांत्रिक व अतांत्रिक पदांच्या भरतीसाठी विशेष मोहिम राबविण्याबाबत कळविण्यात आले आहे, त्यानंतर 6 महिन्याच्या कालावधीमध्ये रिक्त होणा-या पदांच्या भरतीसाठी दुसरी विशेष मोहिम राबविण्यात यावी. असा सदर बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत लवकरच नियमित करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. याबाबत महत्वाचे परिपत्रक 17 ऑक्टोबर 2023 रोजी काढण्यात आले आहे. [परिपत्रक पहा]

NHM कंत्राटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, सेवेत कायम करण्याची मागणी

कंत्राटी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार नवीन वेतनश्रेणीचा लाभ!

नॅशनल हेल्थ मिशन NHM मध्ये कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नवीन वेतनश्रेणीचा लाभ मिळणार असून, विविध 51 संवर्गातील पदांच्या कर्मचाऱ्यांसाठी समकक्ष पदाप्रमाणे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी निश्चित करण्यात आली आहे, यास नुकतीच वित्त विभागाने मान्यता दिली आहे. सविस्तर वाचा..

मोठी बातमी! अखेर राज्यातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला! आदेश पहा
राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या ठोक मानधनात वाढ करून निवडीबाबत सुधारित शासन निर्णय जारी...

Post a Comment (0)
Previous Post Next Post