कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करण्याचा मोठा निर्णय! नवीन शासन निर्णय जारी

Contractual Employees Regular In Service : मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर भारतरत्न इंदिरा गांधी रूग्णालय येथे तात्पुरत्या स्वरूपात ठोक मानधनावर 'अधिपरिचारीका व शस्त्रक्रिया सहायक/परिचर' या कर्मचाऱ्यांना महानगरपालिका सेवेत नियमित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे.

$ads={1}

कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करण्याचा मोठा निर्णय! नवीन शासन निर्णय जारी

Contractual Employees Regular In Service

राज्यातील इतर महानगरपालिकांमध्ये विहीत मार्गाचा अवलंब करून नियुक्त झालेल्या ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांचे कायमस्वरूपी समावेशन करण्यात आले असल्याने, त्याच धर्तीवर मिरा-भाईंदर महानगरपालिकेमधील ठोक मानधनावर तात्पुरत्या स्वरूपातील कार्यरत असलेल्या 'अधिपरिचारीका व शस्त्रक्रिया सहायक/परिचर' पदनामाच्या कर्मचाऱ्यांना, मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या नियमित आस्थापनेवर सेवेत नियमित करण्यास शासनाने दिनांक 1 डिसेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

मिरा-भाईंदर महानगरपालिका भारतरत्न इंदिरा गांधी रूग्णालय अंतर्गत १२ 'अधिपरिचारीका व शस्त्रक्रिया सहायक/परिचर' संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या ठोक मानधनावरील तात्पुरत्या नेमणूका ह्या विहित मार्गाचा (जाहिरात / लेखी परीक्षा / मुलाखत) अवलंब करून झालेल्या आहेत.

मिरा-भाईंदर महानगरपालिकेचा आकृतीबंध दि.२६.०२.२०१९ च्या शासन निर्णयान्वये 'अधिपरिचारीका' संवर्गाची पदे S-१३ : ३५४००-११२४०० व 'शस्त्रक्रिया सहायक/परिचर' संवर्गाची पदे ४-५, १८०००-५६९०० या वेतनश्रेणीत मंजूर करण्यात आलेली आहेत. त्यानुसार सदर रिक्त पदांवर त्यांना नियुक्ती देण्यात येणार आहे.

गुड न्यूज! राज्यातील 34 कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत नियमित

या कर्मचाऱ्यांना, मिरा भाईंदर महानगरपालिका आकृतीबंधातील मंजूर व रिक्त पदांवर पुढील अटी व शर्तीच्या अधीन राहून कायम नियुक्ती देण्यात येणार आहे.

  1. या कर्मचाऱ्यांना सदर पदांवर शासन निर्णयाच्या दिनांकापासून नियुक्ती देण्यात यावी. 
  2. या कर्मचाऱ्यांना पदस्थापनेच्या दिनांकापासून कायम सेवेचे तद्नुषंगिक लाभ (वेतन, सेवा जेष्ठता, निवृत्तीवेतन) देय असणार आहे. 
  3. सदर कर्मचाऱ्यांना यापूर्वी केलेल्या सेवेचे कोणतेही लाभ अथवा थकबाकी अनुज्ञेय नसेल.
  4. सदर कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरीता कोणताही निधी शासनाकडून उपलब्ध करून दिला जाणार नाही.
  5. सेवेत कायम करण्यापूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांकडून बंधपत्र घेऊन मागील कोणताही लाभ मिळणार नाही याचा स्पष्ट उल्लेख करावा लागेल.
  6. कंत्राटी कर्मचाऱ्यांना नेमणूक देताना कोणत्याही पूर्वलक्षी प्रभावाशिवाय आदेशाच्या दिनांकापासून स्थायी कर्मचारी समजण्यात येईल. 
  7. प्रस्तावित ठोक मानधनावरील 'अधिपरिचारीका व शस्त्रक्रिया सहायक/परिचर' यांचे वय सेवा भरती नियमांमध्ये नमूद केलेल्या वयोमर्यादेपेक्षा जास्त असल्यास वयाची व शैक्षणिक अर्हतेची अट शिथील करणेस मंजूरी देण्यात येत आहे. (शासन निर्णय)

$ads={2}

Post a Comment (0)
Previous Post Next Post