Diwali School Holiday 2023 : राज्यातील शाळा दिवाळी सुट्टी नंतर पुन्हा या तारखेपासून सुरु होणार

Diwali School Holiday 2023 : नुकताच दिवाळी सण रविवार, 12 ऑक्टोबर 2023 रोजी झाला, दीपावली सणाच्या सुट्याबाबत राज्यामध्ये एकसमानता आणण्यासाठी शिक्षण संचनालय पुणे यांनी एक महत्वाचे परिपत्रक काढले होते, यंदा दीपावली सणाच्या सुट्टीनंतर पुन्हा शाळा सुरु करण्याबाबत कळविण्यात आलेले आहे.

राज्यातील शाळा दिवाळी सुट्टी नंतर पुन्हा या तारखेपासून सुरु होणार

Diwali School Holiday 2023

राज्य शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्टी अधिसूचनेनुसार नोव्हेंबर 2023 या महिन्यात दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) 12 नोव्हेंबर 2023, दिवाळी (बलिप्रतिपदा) 14 नोव्हेंबर 2023, 15 नोव्हेंबर 2023 (भाऊबीज) गुरुनानक जयंती 27 नोव्हेंबर 2023 या सुट्या जाहीर केलेल्या आहेत, तसेच या महिन्यात 4 रविवार आणि 4 शनिवार (पाच दिवसाचा आठवडा) अशा एकूण 11 सार्वजनिक सुट्ट्या आणि दीपावली सणाच्या अतिरिक्त सुट्ट्या मिळणार आहे.

राज्यामध्ये विविध विभागानुसार दिवाळी सणाच्या सुट्ट्या कमी जास्त मिळतात, कारण कोकणात गणपती उत्सव, तसेच विदर्भातील शाळा जून मध्ये उन्हाच्या तीव्रतेने उशिरा सुरु होतात, तसेच मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमानुसार शाळांच्या सुट्ट्या 1 ते 2 दिवस मागे पुढे असतात मात्र यंदा राज्यात 6 नोव्हेंबर पासून शाळांना काही जिल्हाने सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. आता या संदर्भात शिक्षण संचनालय पुणे कार्यालयाकडून नवीन परिपत्रक काढण्यात आले आहे.

विविध संघटनानी केलेल्या विनंती नुसार सन 2023 24 मधील दिपावली सुट्यांबाबत राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालये (शिक्षण विभाग) यामध्ये समानता येण्यासाठी दि. 9 नोव्हेंबर 2023 ते 25 नोव्हेंबर 2023 या कालावधीत दिवाळीची सुट्टी जाहीर करण्याबाबत मा शिक्षण संचनालय पुणे यांनी राज्य शासनाकडे विनंती केली आहे. त्यामुळे आता 9 नोव्हेंबर पासून शाळांना सुट्टी मिळण्याची शक्यता आहे.

कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! पुढील वर्षात (2024) मध्ये तब्बल 129 सुट्ट्या

दीपावली सणाला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले असता साधारणपणे दिनांक 9 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2023 पर्यंत शाळांना सुट्टी मिळणार असून, दिवाळी सणानंतर पुन्हा दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी रविवार व दिनांक 27 नोव्हेंबर 2023 रोजी गुरुनानक जयंती असल्याने, दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी पासुन नियमित शाळा सुरू होणार आहेत. अशा एकूण जवळपास 19 दिवसाची दीर्घ सुट्टी शाळांना मिळणार आहे. (परिपत्रक पहा)

कंत्राटी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार नवीन वेतनश्रेणीचा लाभ!
राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश!
दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! निवृत्तीवेतनाचे लाभ मंजूर

Post a Comment (0)
Previous Post Next Post