Anganwadi Employees Bhaubij Gift : गुड न्यूज! विशेष बाब म्हणून प्रथमच नवनियुक्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ‘भाऊबीज भेट’

Anganwadi Employees Bhaubij Gift: राज्यातील नवनियुक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी तीन कोटी ‘भाऊबीज भेट’ रक्कम मंजूर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आतापर्यंतच्या कालावधीत प्रथमच विशेष बाब म्हणून नवनियुक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना भाऊबीज भेट रक्कम मंजूर करण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

गुड न्यूज! विशेष बाब म्हणून प्रथमच नवनियुक्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 'भाऊबीज भेट'

anganwadi employees bhaubij gift

मार्च 2023 पर्यंत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना आतापर्यंत भाऊबीज दिली होती. या बाबतचा शासन निर्णय नुकताच महिला व बालविकास  विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे. त्यानुसार दिनांक 1 एप्रिल, 2023 ते दिनांक 31 ऑक्टोबर, 2023 या कालावधीत अंगणवाडी सेविका (Anganwadi Sevika), मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना यावर्षीही दिवाळीला भाऊबीज भेट दिली आहे. 

यापूर्वी दिलेली भाऊबीज भेट म्हणून दिलेले 37 कोटी 33 लाख रुपये  आणि आज नवनियुक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना  भाऊबीज भेट म्हणून दिलेले 3 कोटी असे एकूण 40 कोटी रुपये वितरित  करण्यात आले आहेत.

कंत्राटी पदांकरीताही दिव्यांग आरक्षण लागू करणेबाबतचा शासन निर्णय निर्गमित

ही मदत लवकरात लवकर जिल्ह्यात वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

गुड न्यूज! राज्यातील 34 कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत नियमित
विद्यार्थ्यानो लक्ष द्या! दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट!

Post a Comment (0)
Previous Post Next Post