महत्वाची बातमी! कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात महत्वाची बैठक संपन्न, वाचा सविस्तर..

Employee News : मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध सरकारी तसेच कंत्राटी, रोजंदारी, सफाई कामगार कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात महत्वाची बैठक दिनांक 8 नोव्हेंबर 2023 रोजी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यामध्ये विविध मागण्या मान्य करून संबंधित अधिकाऱ्यांना महत्वाचे निर्देश देण्यात आले, त्याचबरोबर या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त 26 हजार रूपये सानुग्रह अनुदान देण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.

सरकारी तसेच कंत्राटी, रोजंदारी, सफाई कामगार कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात महत्वाची बैठक संपन्न

Employee News

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यावर्षी दिवाळीनिमित्त २६ हजार रूपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्याचबरोबर महापालिका कर्मचाऱ्यांना पाच लाख रूपयांपर्यंत गटविमा योजना लागू करण्याचा निर्णयही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी घेतला.

'वर्षा' निवासस्थानी मुंबई महापालिकेच्या विविध कर्मचारी आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी महापालिका आयुक्त आय एस चहल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के एच गोविंदराज, बेस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंघल, माजी आमदार किरण पावसकर यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

गेल्या वर्षी दिवाळी सानुग्रह अनुदान देताना पहिल्यांदाच २५०० ने वाढ करण्यात आली होती. यावर्षी त्यात वाढ करून २६ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी रोजंदारीवर काम करणाऱ्या बहुउद्देशीय कामागारांना देखील सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली त्यावर रुग्णालय बहुउद्देशीय कामगार आणि बालवाडी शिक्षिकांना दिवाळी भेट देण्यासंदर्भात महापालिका आयुक्तांना निर्देश दिले.

गुड न्यूज! या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त मोठी भेट

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना लागू असलेली गट विमा योजना २०१७ पासून बंद होती. ती पुन्हा सुरू करण्याचे निर्देश देतानाच त्यात वाढ करून पाच लाखापर्यंतची गट विमा योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय आणि ही योजना जानेवारी २०२४ पासून लागू करण्याबाबत प्रशासनाला मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी निर्देश दिले. आशा सेविका यांना एक महिन्याचे वेतन सानुग्रह अनुदान देण्याबाबतही याबैठकीत निर्णय घेण्यात आला.

दिलासादायक बातमी! राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी निधी वितरीत

महापालिकेच्या कामगार वसाहतींमध्ये नियमीत स्वच्छता करतानाच तेथील शौचालये, स्वच्छतागृहे यांची दुरुस्ती देखील करण्यात यावी,  असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. सफाई कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षणाची संधी प्राप्त व्हावी यासाठी शिष्यवृती देण्याची देखील कार्यवाही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

गुड न्यूज! राज्यातील 34 कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत नियमित
आशाताईंची दिवाळी होणार गोड, भरघोस मानधन वाढीसह दिवाळीचीही भेट

Post a Comment (0)
Previous Post Next Post