HSC Board Exam 2024 : विद्यार्थ्यानो लक्ष द्या! दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट!

HSC Board Exam 2024 : सन 2024 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावी (SSC HSC Board Exam 2024) बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले असून, आता या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरणे सुरु आहे. यासाठी सर्व माध्यमिक शाळाप्रमुखांनी विद्यार्थ्यांचे अर्ज नियमित शुल्कासह सरल डाटाबेसवरून दिनांक 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत भरावेत, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय मंडळाचे सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी कळविले आहे.

विद्यार्थ्यानो लक्ष द्या! दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट!

HSC Board Exam 2024

दहावी बारावी परीक्षांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार 12 वी (HSC Exam Date 2024) लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे, तर दहावी (SSC Exam Date 2024) लेखी परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे. 

बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणारे नियमित विद्यार्थी, व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय (ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी) चे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत या संकेतस्थळावर प्रचलित पद्धतीने भरण्याची मुदत दिनांक 20 नोव्हेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे.

महत्वाची बातमी! कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात महत्वाची बैठक संपन्न, वाचा सविस्तर..

उच्च माध्यमिक शाळा / महाविद्यालयांनी चलन डाऊनलोड करून शुल्क भरण्याची तारीख शुक्रवार 24 नोव्हेंबर 2023 पर्यंत वाढविण्यात आली असल्याचे मुंबई विभागीय मंडळाचे विभागीय सचिव डॉ.सुभाष बोरसे यांनी कळविले आहे.

अधिक माहितीसाठी - https://www.mahahsscboard.in/

सुवर्णसंधी! सारथीकडून नागरी सेवा परीक्षेचे मोफत प्रशिक्षण, येथे करा अर्ज

गुड न्यूज! राज्यातील 34 कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत नियमित
आशाताईंची दिवाळी होणार गोड, भरघोस मानधन वाढीसह दिवाळीचीही भेट

Post a Comment (0)
Previous Post Next Post