दिलासादायक बातमी! राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी निधी वितरीत

Employees Salary : वर्षभरातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी, या निमित्ताने सरकारी कर्मचारी तसेच कंत्राटी, रोजंदारी पद्धतीने कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांना वेळेत पगार, बोनस, इतर भत्ते देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असते, त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ, मानधन वाढ, बोनस असे विविध निर्णय घेण्यात आले आहे, आता राज्यातील राष्ट्रीय छात्र सेना कार्यालयातील कंत्राटी पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे मानधन निधी वर्ग करण्यात आला आहे.

employees salary

राष्ट्रीय छात्र सेनेच्या कार्यालयांसाठी कंत्राटी तत्वावर १४० पदे भरण्यास वित्त विभागाने मान्यता दिली आहे. राष्ट्रीय छात्र सेना कार्यालयातील बाहययत्रंणाद्वारे नियुक्त केलेल्या १४० कंत्राटी कर्मचाऱ्यांचे जून २०२३ पर्यंतचे मानधन अदा करण्यात आले आहे. 

आता जुलै २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या आठ महिन्यांच्या कालावधीकरिता सदरहू १४० पदांच्या वेतन, मानधनाकरीता निधी वितरीत करण्यास दिनांक ८ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता दिली आहे. (शासन निर्णय) त्यामुळे आता दिवाळीपूर्वी या कर्मचाऱ्यांचा पगार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गुड न्यूज! राज्यातील 34 कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत नियमित
महत्वाची बातमी! कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात महत्वाची बैठक संपन्न, वाचा सविस्तर..

Post a Comment (0)
Previous Post Next Post