आशाताईंची दिवाळी होणार गोड, भरघोस मानधन वाढीसह दिवाळीचीही भेट - आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांची घोषणा

राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेअंतर्गत कार्यरत असलेल्या ८० हजारांपेक्षा अधिक आशा स्वयंसेविकांना ७ हजार रुपये तर 3,664 गट प्रवर्तकांना प्रत्येकी 6,200 रुपयांची घसघशीत मानधन वाढ आणि त्याचबरोबर त्यांना प्रत्येकी 2,000 रुपयांची दिवाळी भेट देण्याची घोषणा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी मुंबई येथे केली.

आशाताईंची दिवाळी होणार गोड, भरघोस मानधन वाढीसह दिवाळीचीही भेट - आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांची घोषणा

nhm-employees-news

आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई कार्यालयात आशा स्वयंसेविका, संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासोबत आयोजित बैठकीत आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी ही घोषणा केली. या  बैठकीला आरोग्य विभागाचे प्रधान सचिव श्री. मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानचे संचालक श्री. धीरज कुमार, सहसंचालक सुभाष बोरकर, सहसंचालक तुलसीदास सोळंके यांच्यासह आरोग्य विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. 

राज्यात सन 2007 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत 'आशा सेविका' योजनेची अंमलबजावणी होत आहे. सद्यस्थितीत राज्यात 80 हजारांपेक्षा अधिक आशा सेविका कार्यरत आहेत. आतापर्यंत या आशा सेविकांना 5000 रुपये प्रतिमाह मानधन देण्यात येत होते. आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी या मानधनात 7000 रुपयांची भरघोस वाढ करण्याची घोषणा केली. या आशा सेविकांना केंद्र शासन स्तरावरूनही 3000 रुपये मानधन दिले जाते.  त्यामुळे आरोग्य मंत्र्यांच्या घोषणेनंतर आशा सेविकांना आता 15,000 रुपये एकत्रित मानधन मिळणार आहे.

महत्वाची बातमी! कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात महत्वाची बैठक संपन्न, वाचा सविस्तर..

राज्यात 3,664 गट प्रवर्तक कार्यरत असून आतापर्यंत त्यांना 6,200 रुपये मानधन देण्यात येत होते. त्यामध्ये आरोग्य मंत्र्यांनी 6,200 रुपये मानधन वाढ जाहीर केली आहे.  गट प्रवर्तकांना केंद्र शासन स्तरावरूनही 8,775 रुपये मानधन मिळत असून, आता त्यांना 21,175 रुपये इतके एकत्रित मानधन मिळणार आहे. याशिवाय या बैठकीत आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना 2 हजार रुपयांची दिवाळी भेट देणार असल्याचीही घोषणा आरोग्य मंत्री प्रा डॉ. सावंत यांनी केली आहे.

$ads={2}

कंत्राटी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार नवीन वेतनश्रेणीचा लाभ!
राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश!
दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! निवृत्तीवेतनाचे लाभ मंजूर

Post a Comment (0)
Previous Post Next Post