Employees Salary News : गुड न्यूज! राज्यातील या कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान मंजूर; शासन आदेश जारी..

Employees Salary News : राज्यातील कर्मचाऱ्यांना सरकारकडून सणासुधीच्या दिवसामध्ये वेतनावरील खर्च, अग्रिम आणि बोनस मंजूर करून अदा करण्याची प्रक्रिया जलद गतीने सुरु आहे, दिवाळी सणाला काही दिवस शिल्लक असताना राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांना वेळेत पगार देण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करण्यात येत आहे, नुकतेच केंद्र व राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता तसेच अग्रिम, बोनस मंजूर केले आहे, आता राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन निधी वितरीत करण्यात आला असून, याबाबतचा शासन निर्णय 30 ऑक्टोबर रोजी निर्गमित करण्यात आला आहे. सविस्तर वाचा..

गुड न्यूज! राज्यातील या कर्मचाऱ्यांचे वेतन अनुदान मंजूर

employees salary news

नुकतेच केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोग नुसार महागाई भत्यात 4% टक्क्यांची वाढ केली तर राज्य सरकारने अखिल भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ केली, तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील DA ची वाढ करून ऑक्टोबर च्या वेतनासहित जुलै 2023 पासून वाढ मिळणार आहे. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ व अनुभव बोनस बाबत एक महत्वाचे परिपत्रक काढले आहे.

त्याचबरोबर राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देखील भाऊबीज बोनस मंजूर करण्यात आला आहे, याप्रमाणे राज्यातील प्रत्येक कर्मचाऱ्यांना दिवाळीचे मोठे गिफ्ट सरकारकडून मिळत आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन (Salary Arrears) मंजूर करून अदा करण्यात आले आहे.

आनंदाची बातमी! या कर्मचाऱ्यांना मानधन वाढीसह दिवाळी बोनस जाहीर

आता राज्यातील वाशिम, जालना, बुलढाणा व यवतमाळ येथील सैनिकी शाळांतील २० टक्के अनुदानावरील अतिरिक्त तुकड्यांवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २० % प्रमाणे वेतन दिले जाते. मंजूर अतिरिक्त तुकड्यावरील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन निधी वितरीत करण्यात आला आहे.

मोठी अपडेट! कंत्राटी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ व अनुभव बोनस मिळणार? महत्त्वाचे परिपत्रक

सन २०२२ २३ च्या पावसाळी अधिवेशनात सदर पुरवणी मागणी मंजूर करून मंजुर अर्थसंकल्पीय अनुदानातुन खर्च भागविण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. परंतु सन २०२२ २३ मध्ये मंजुर तरतुद पुरेशी नसल्याने यवतमाळ, वाशीम, जालना व बुलढाणा या जिल्ह्यांतील सैनिकी शाळांतील कर्मचाऱ्यांना वेतन अदा होऊ शकले नव्हते.

आता सन २०२३ २४ आर्थिक वर्षामध्ये ४ सैनिकी शाळेतील अतिरिक्त तुकड्यांवरील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना २०% प्रमाणे अतिरिक्त अनुदान आवश्यकता असल्याने शिक्षण उपसंचालक (अंदाज व नियोजन), शिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सादर केलेला रुपये छत्तीस लाख अडुसष्ट हजार या रकमेचा पुरवणी मागणी प्रस्ताव पावसाळी अधिवेशनात मंजुर करण्यात आलेला आहे. सदर मंजुर तरतूद वित्त विभागाने वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. (शासन निर्णय पहा)

$ads={2}

कंत्राटी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार नवीन वेतनश्रेणीचा लाभ!
राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश!
दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! निवृत्तीवेतनाचे लाभ मंजूर

Post a Comment (0)
Previous Post Next Post